10/05/2025
गेले तीन चार महिने हाय वे ला पसरलेल्या बनावट सातारी कंदी पेढ्यांबाबत असंख्य तक्रारी येत होत्या, आमची नावे वापरून काही बिहारी, राजस्थानी, उत्तर भारतीय लोकांनी मोदी लाटकर ही नावे वापरून लाटकर बंधू, लाटकर स्वीटस अशी दुकाने चालू करून बोगस, निकृष्ट दर्जाचा कंदी पेढा विकत आहे. मोठी दुकाने, भपकेबाज बोर्ड, भरगच्च भरलेला इतर माल यामुळे ग्राहक आकर्षित होत होता, पण हाय वे वर मिळणारी सातारी कंदी पेढ्याची क्वालिटी अगदीच बोगस. यामुळे गेले 150 वर्षांपासून साताऱ्याचा सांस्कृतिक वारसा असलेले, एक खास ओळख म्हणून नावाजलेला सातारी कंदी पेढा गेल्या 3 वर्षात नावासह, दर्जा पण उरलेला नाही अशीच चर्चा सर्वत्र ऐकू येऊ लागली.
म्हणूनच आम्ही ओरिजनल, पारंपरिक वारसा असलेले मोदी लाटकर कुटुंबियातील पाचजण हाय वे वरील दुकानांना भेट द्यायला बाहेर पडलो.
दुकानात बिहारी कामगार, कोणत्या लाटकरांचे दुकान विचारल्यावर सांगता येईना, केवळ एकच दुकानात लायसेन्स ते ही शर्मा नावाचे, इतर ठिकाणी तर लायसेन्स पण नाही, सर्व दुकानात एकाच प्रकारचे बॉक्स.. कोण शर्मा, कोण अग्रवाल तर कोण पुरोहित असा सगळा कारभार. एकजण म्हणाला आमचे मुख्य दुकान मोती चौकात आहे, तो जे दुकान सांगत होता त्याचा मालक श्री पवन शरद लाटकर समोरच ..
प्रत्येकाला सांगून आलोय की तुम्ही तुमची नावे मोठी करा. आमच्या नावाला बट्टा लावू नका, सातारी कंदी पेढ्यांची प्रत, किंमत कमी करू नका.
वाढेफाटा येथील तीन दुकानांनी आणि नागठाणे येथील एक दुकानांनी त्याच दिवशी बोर्ड काढलेत, अजून तीन बाकी आहेत.
सातारी कंदी पेढा जरूर विका पण दर्जा राखून...
राष्ट्रीय महामार्गावर आमचे कोणतेही दुकान नाही.
खालील आमची ऑफिशियल दुकाने आहेत.
मोती चौक
योगेश गुरुचरण सब्बरवार {मोदी }
योगेश स्वीट्स मोदी पेढेवाले.
149,सदाशिव पेठ, श्री पंचमुखी गणेश मंदिरा समोर सातारा.
MOB NO:-9922264444
FSSAI NO :-11516039000764
करिष्मा मोदी
सुमुख स्वीटस् तुळजाराम मोदी
230, मोती चौक,
Mob: 9923300403,
9970931956
FSSAI no: 11521039000546
मोती चौक
विशाल राजन मोदी
बाळप्रसाद मोदी
257 भवानी पेठ मोती चौक
9975676766
9371311303
FSSAI NO : 11520039000259
मोती चौक
पवन शरद लाटकर.
लाटकर बंधू स्वीट मार्ट पेढेवाले
२६० भवानी पेठ मोती चौक छत्री हौद शेजारी सातारा.
९६२३०४०४०७
९९२२९०८९०२
FSSAI LIC NO :- 11518039000250
पोवई नाका
उदय अशोक मोदी
अशोक मोदी कंदी
पेढेवाले
173 विठ्ठल लीला कॉम्प्लेक्स रविवार पेठ सातारा मोबाईल नंबर 9822116116
FSSAI no 11514039000036
पोवई नाका
पवन शरद लाटकर.
लाटकर बंधू स्वीट मार्ट पेढेवाले
मरीआई महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, पोवई नाका, IDBI BANK समोर सातारा.
९६२३०४०४०७
९९२२९०८९०२
FSSAI LIC NO :- 11518039000250
विसावा नाका
प्रशांत मोहन मोदी
मोदी' ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका, मारुती मंदिराशेजारी,
राष्ट्रीय महामार्ग जवळ, सातारा
9145500012
FSSAI NO. 11521039000896
ग्राहकांनी सजग राहून फक्त सातारा शहरातील अधिकृत दुकानांमधून खरेदी करावी.
सातारी कंदी पेढ्याचा खरा स्वाद आणि त्यामागील शुद्धता टिकवण्यासाठी, मोदी-लाटकर यांच्या या लढ्याला साथ द्या. बनावट दुकानांना ठेचून, खऱ्या वारशाला उजाळा द्या !
टीप: खऱ्या सातारी कंदी पेढ्याचा आनंद घ्या, पण राष्ट्रीय महामार्गावरील फसवणुकीपासून सावध रहा!
*सातारी कंदी पेढा प्रेमींनी शेअर करावे.
इतर नावे अपडेट होतील