13/03/2026
आपला आठवड्याचा आहार परीपूर्ण व्हावा यासाठी फडके ऑरगॅनिकची टीम सतत प्रयत्नशील असते..
एका चौकोनी कुटुंबासाठी चौरस आहार अश्या पद्धतीने तुम्ही plan करू शकता 👇🏻
आठवड्याच्या 14 जेवणांचा आणि 7 नाष्टे यांचा असा व्यवस्थीत प्लॅन तुम्ही करू शकता.
1) आठवड्यातून 3 वेळा दाट पालेभाजी (पीठ पेरून कोरडी अथवा ताकातील पालक/ चाकवत) ,सोबत बीट, मुळा,कोबी, यांचे सलाड/पचडी
2) आठवड्यातून 4 वेळा उसळ ( मूग/ चवळी/मटकी/ काळा घेवडा/ वरुण घेवडा यापैकी कोणतेही ) सोबत iceberg/ब्रोकोली/lettuce/ कच्चे टोमॅटो/लाल टोमॅटो/काकडी) यांचे सलाड/ कोशिंबीर..
3) आठवड्यातून 4 वेळा वेगवेगळ्या डाळींची आमटी / दाट वरण ( तूरडाळ+ शेवगा, मुगडाळ (टोमॅटो, कांदा घालून/ किंवा ओले खोबरे-लसूण घालून), चवळी/ मटकी/मिक्स चुर डाळ यांची आमटी
सोबत वांगे भरीत/ हिरवे टोमॅटो भरीत/ दोडका भाजी(भरून/फोडींची) , भरले वांगे भाजी/ flower/कोबी/beans/ सांडगे भाजी /वालघेवडा/भेंडी/गवार
4)आठवड्यातून 4 वेळा वेगळे काहीतरी try करा
टोमॅटो सार/सूप, mix veg भाजी, घोसाळे भजी, पुलाव, सलाड
भाकरी-पिठले, खोबरे चटणी, कांदा कोशिंबीर, पापड, उडीद डाळ घुटे, बटाटा पापड, दही भात
Veg बिर्याणी- ताक-सलाड,पुदिना सरबत
गहू दलिया/ज्वारी दलिया यांचा भाज्या (beans, flower/कोबी, मटार, टोमॅटो,कांदा),लोणी घालून खिचडा , पालक /टोमॅटो सूप, पापड/कुरडई
चाकोल्या, दही-भात, पापड, salad.
5) डावीकडची तोंडीलावणी
दोडक्याच्या सालीची/दुधीच्या सालीची तीळ, जिरे, मिरची घालून चटणी, कोथिंबीर, पालक, चाकवत, लाल माठ च्या देठांची देठी, हिरवे टोमॅटो भरीत ( जिरे,मिरच,कूट घालून), घोसावळे भरीत, काकडी,टोमॅटो सलाड, मेतकूट, कारले चटणी, जवस चटणी, पापड, कुरडई, सांडगे चाट,
6) 7 दिवसांचे 7 नाष्टे
~थालीपीठ- लोणी-लोणचे
~Mix डाळ चुरीचे आप्पे
~धिरडे -लोणी
~पालक/मेथी/बीट/बटाटा पराठे
~ गहू रवा/ज्वारी रवा, ओले खोबरे, गूळ शीरा किंवा भाज्या घालून खिचडा
~ गहू रवा-गूळ खांडवी
~ वरण भात-तूप-लिंबू
- बाजरी पीठ, आले-मिरची-लसूण पेस्ट,तीळ चालून खमंग वडे आणि दही
या सोबत रोज एक फळ ( कलिंगड, खरबूज, चिकू, केळे, पपई आणि आंबे)
अधून मधून घ्यायला पुदिना, लिंबू सरबत, कैरी पन्हे, पालक/बीट/मिक्स veg सूप..दूध- प्रथिनांमृत , नाचणी कुकीज... सोयाबीन फुटाणे आणि खास खाऊ आहेच की.😋😋
अरे हो विसरलेच ..आणि रोजच्या जेवणात *2 चमचा शेवगा पाला जरूर वापरा* (high protein, high calcium ) .तो ही आपल्या शेतातील 🤗🤗
*झाला की नाही आठवडा भराचा चौरस आणि सकस आहार!* !
☺️🤗🤗
आणि हे सगळं आपल्या लिस्ट मधील गोष्टी वापरून !!
तर मग वाट कसली पाहता ..तुमचा आठवडाभराचा चौरस आहार आजच book करा.लिंक वर दिली आहेच..🙋♀️🙋♀️
*चवीने आणि पौष्टीक खाणार त्यांना फडके ऑरगॅनिक नक्की देणार*
👍
🌱🌿☘️🍀