14/01/2026
महानगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुका मध्ये नगरसेवकाची निवड करताना, सध्या निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारा पैकी कोणता उमेदवार नगरसेवकाने करावयाची कामे करण्यास सक्षम, योग्य आहे, टक्केवारी न घेता, भ्रष्टाचार न करता, प्रामाणिक पने कामे करेल अशी खात्री आणि विश्वास असलेल्या उमेदवाराची जात, धर्म, रंग इ. न पाहता त्या उमेदवाराला स्वतः मतदान करावे आणि इतरांना देखील सांगावे जेणेकरून पुढील ५ वर्ष तुम्हांला खाली नमूद कामासाठी नगरसेवक, महानगर पालिकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
लाच घेऊन चुकीचा उमेदवार निवडणे सोपे पण पुन्हा पुढच्या निवडणुकी पर्यंत तुमची कामे नाही झाली म्हणून तक्रार करायची नाही.... याउलट सारासार विचार करून, चांगल्या सक्षम, योग्य उमेदवाराची निवड करणे काहीसे अवघड काम परंतू योग्य उमेदवार निवडल्यास पुढील ५ वर्ष खाली नमूद नगरसेवकाने खाली नमूद केलेली, त्यांनी करावयाची कामे होण्याची शक्यता जास्त ... त्यामुळे जरासा अमिषाचा मोह टाळला तर जीवनमान सुखकारक, समाधानी, आनंदी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तुमचा योग्य निर्णय .....तुमची आणि पर्यायाने शहराची, राज्याची, देशाची सुधारणा होणार की अधोगती होणार हे ठरवणार असल्यामुळे मतदानास हलक्यात घेऊ नये... इतकच .....
🔰 नगरसेवकाची मुख्य कामे :
१) नागरिकांच्या समस्या
नागरिकांच्या समस्या सोडवणे —
पाणी, रस्ते, कचरा, गटार, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित तक्रारी पालिकेकडे मांडणे आणि निराकरण करून घेणे.
२) विकासकामे
विकासकामे करून घेणे —
रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, CCTV, खेळाचे मैदान आदी सुविधा योजना करून प्रत्यक्षात आणणे.
३) निधी व बजेट
निधी व बजेटचे व्यवस्थापन —
वॉर्डसाठी बजेट मागणी, कामांसाठी निधी मंजूर करून घेणे आणि योग्य वापर सुनिश्चित करणे.
४) सभा व निर्णय
सभा व निर्णय प्रक्रिया —
महापालिका सभांना उपस्थित राहणे, प्रश्न मांडणे, सूचना देणे आणि मतदान करून निर्णय घेणे.
५) नागरिकांशी संपर्क
नागरिकांशी थेट संवाद —
वॉर्डसभा, दौरे, भेटी घेणे व सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
६) मूलभूत सुविधा
मूलभूत सुविधा उपलब्ध करणे —
स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि शहर सौंदर्यीकरण यावर काम करणे.
७) आपत्कालीन मदत
आपत्कालीन परिस्थितीत मदत —
पूर, साथी रोग, दुर्घटना, संकट काळात नागरिकांना तातडीची मदत पुरवणे.
🔰 Main Duties of a Corporator
1) Citizens’ Problems
Solving citizens’ problems —
Addressing complaints related to basic facilities such as water, roads, garbage, drainage and street lights and ensuring proper solutions through the municipal corporation.
2) Development Works
Carrying out development works —
Planning and implementing facilities like roads, water supply, parks, CCTV and playgrounds.
3) Funds & Budget
Management of funds and budget —
Requesting budget for the ward, getting funds approved for projects and ensuring their proper use.
4) Meetings & Decisions
Participation in meetings and decision-making —
Attending municipal meetings, raising issues, giving suggestions and voting to make decisions.
5) Public Communication
Direct communication with citizens —
Holding ward meetings, visiting local areas and informing citizens about government schemes.
6) Basic Facilities
Providing essential services —
Working for cleanliness, health, education, environmental protection and city beautification.
7) Emergency Support
Providing help during emergencies —
Offering immediate assistance to citizens during floods, epidemics, accidents and crisis situations.
साभार:- RTI page..