Ghedima

Ghedima A delicious, nutritious blend of wholesome ingredients crafted to nourish the body while delivering rich, satisfying flavors for health-conscious enjoyment.

01/11/2025
15/08/2025
08/08/2025

मौजे समशेरपूर येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा

मौजे समशेरपूर येथे कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, कोळदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. उमेश पाटील, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा उपस्थित होते. त्यांनी गटातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धतींचे सखोल मार्गदर्शन केले. जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क व निळोबी अर्क तयार करण्याच्या पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

उप कृषि अधिकारी श्री. गोपाळ वळवी यांनी कृषि विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषि अधिकारी श्री. अविनाश सावंत यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रगतशील शेतकरी श्री. नरोत्तम गोविंद पटेल यांनी आभार मानले. तसेच श्री. सोमेश्वर चौधरी, जयेश पटेल, कृषि सखी मयुरी चौधरी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळाली.
#राष्ट्रीयनैसर्गिकशेतीमिशन #जीवामृत #बिजामृत #कृषिविज्ञानकेंद्र

06/08/2025

नंदुरबार जिल्ह्यात ‘आदर्श ग्राम अभियान’ची सुरुवात – तुमचं गाव आदर्श ग्राम ठरू शकतं, आजच नोंदणी करा!

नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर ‘आदर्श ग्राम अभियान’ सुरू करण्यात येत असून, ग्राम पंचायत, सेवाभावी संस्था, प्रशासन व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त सहभागातून गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

🔶 अभियानाची ठळक वैशिष्ट्ये:
गावांच्या प्रगतीचे मूल्यमापन खालील निकषांवर आधारित असेल:
⦁ पायाभूत सुविधा आणि विकास
⦁ आर्थिक विकास
⦁ आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण
⦁ समुदाय सहभाग आणि स्थानिक शासन सक्षमीकरण
⦁ शाश्वता व पर्यावरण संवर्धन
⦁ तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश

🏆 पुरस्कार व प्रोत्साहन:
🔹 जिल्हास्तरावरील पुरस्कार:
1. प्रथम क्रमांक – ₹२० लाख व सन्मानचिन्ह
2. द्वितीय क्रमांक – ₹१५ लाख व सन्मानचिन्ह
3. तृतीय क्रमांक – ₹१० लाख व सन्मानचिन्ह

🔹 तालुकास्तरावरील पुरस्कार:
1. प्रथम क्रमांक – ₹१० लाख व सन्मानचिन्ह
2. द्वितीय क्रमांक – ₹८ लाख व सन्मानचिन्ह
3. तृतीय क्रमांक – ₹५ लाख व सन्मानचिन्ह

⏩ याशिवाय, निवड झालेल्या गावांना विकासासाठी अतिरिक्त निधी देखील दिला जाणार आहे.

अभियानात सहभाग कसा घ्यावा?
▪ इच्छुक ग्रामपंचायतींनी स्वतःच्या पंचायत समितीशी संपर्क साधावा.
▪ 12 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख असून, त्या अगोदर सहभागाची नोंदणी अनिवार्य आहे.

अभियानाची रूपरेषा:
▪ प्रत्येक तालुक्यातून २० गावे निवडली जातील
▪ तालुकास्तरीय स्पर्धा – प्रत्येकी ३ गावांना पुरस्कार
▪ या निवडक ३ गावे पुढे जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील
▪ सर्व तालुक्यांमधून एकूण १८ गावे जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेणार

नंदुरबार जिल्ह्याच्या आदर्श ग्राम अभियानात तुमच्या गावाचा सहभाग नोंदवा आणि गावाला एक नवा शाश्वत विकासाचा चेहरा द्या!

कमेंट्स मध्ये तुमचे प्रश्न विचारा.
#आदर्शग्राम #नंदुरबारविकास #सामूहिकसहभाग #ग्रामविकास #सस्टेनेबलविलेज

Address

Nandurbar

Telephone

+919420400176

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghedima posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share