09/06/2025
थोडंसं मनातलं.....!
" हसतें हसतें कट जाये रसते
जिंदगी युहीं चलती रहें.... "
कोणतेही काम नव्याने सुरु करायला वयाचं किंवा वेळेचं बंधन नसतं फक्त ते करण्याची जिद्द आणि आवड असावी एवढंच....
म्हणूनच नव्याने एक छोटासा व्यवसाय सुरु केला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स पण भेटत आहे.
खरंतर घरात स्वयंपाक करताना त्यात बनवणाऱ्याच्या प्रेमळ भावना उतरतातच पण त्याबरोबरच आपण स्वयंपाक करतो त्यात जर आपण अप्रतिम आणि उत्तम क्वालिटीचे पदार्थ वापरले तर नक्कीच स्वयंपाक एकच नंबर होणार यात शंका नाही.
आजकाल पैसा फेकून वाटेल ते मिळवता येतं पण घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचं उत्तम दर्जाचं पोषक घरगुती जेवण जर सहज मिळवायचं असेल आणि ते बनवतांना पोषक पणा टिकवायचा असेल तर त्यासाठी उत्तम क्वालिटीचे पदार्थ वापरावे लागतात. इथे जराही तडजोड करून चालत नाही. तरच पदार्थ एकदम छान बनतो.
जसं नोकरी करताना कामाबद्दल appreciation हवं असं वाटतं तसंच घरातल्या स्वयंपाकाबद्दलही जर कौतुक केलं तर उत्साह आणखीन वाढतो. एकच wow शब्द खूप काही देऊन जातो.
YTD म्हणजे yummy tasty delicious असं कौतुक करताना कोणी म्हणालं तर त्यामुळे पदार्थाच्या रेसिपी बरोबरच संसाराची रेसिपी पण भारी बनते यात शंकाच नाही.....
म्हणूनच आपलं किचन परिपूर्ण आणि स्वादिष्ट बनवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
" अकृशा " गृहउद्योग घेऊन येत आहे
" अकृशा मसाले ".
छोट्या प्रमाणावर का होईना पण स्वतः मिर्ची खरेदी करून ती स्वतः निवडून, स्वच्छ धुवून, वाळवून त्यापासून बनवलेले लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला.
आणि ऑरगॅनिक हळद. सध्या छोट्या प्रमाणावर सुरु केला आहे. तसेच खमंग चकली, चिवडा, शंकरपाळी, अनारसे पीठ,
थालीपीठ भाजणी पीठ ही ऑर्डर प्रमाणे देत आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असणार आहेतच. 🙏😊